Breaking News

नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसानभरपाई आमदार मंदा म्हात्रे यांचे प्रयत्न यशस्वी, एमएमआरडीए अधिकार्यांसह बैठक

नवी मुंबई : बातमीदार

एमएमआरडीए  न्हावा-शिवडी सी लिंक क्वारीडोअर रस्त्याचे काम हे समुद्रातून होत असल्यामुळे नवी मुंबईतील कोळीबांधवांच्या होत असलेल्या नुकसान भरपाई पुनर्विकास पॅकेज संदर्भात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचीएम.एमएमआरडीए  सह संबंधिक अधिकार्‍यांसमवेत बांद्रा येथील कार्यालयात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता दत्तात्रेय ठुबे, अधीक्षक अभियंता  शरद वरसकर, कार्यकारी अभियंता गणेश देशपांडे, उप अभियंता भानुदास गायकवाड, विवेक कुलकर्णी उपस्थित होते. नवी मुंबईतील प्रत्येक बाधित कोळी बांधवांस नुकसान भरपाई पॅकेज मिळावे याकरिता बेलापूरच्या आ. म्हात्रे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. तदनंतर बाधित कोळी बांधवांचे नुकसान भरपाई करिता अर्ज भरण्यात आले होते. नवी मुंबईतील मच्छिमार लाभार्थ्यांना ही  नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी यासाठी या  बैठकीत चर्चा करण्यात आली. मच्छिमार लाभार्थ्यांना नुकसान भरपाई पॅकेज देणेसंदर्भात एम.एम.आर.डी.ए. द्वारा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. लवकरच सदरबाबत सर्वेक्षण करण्यासाठी समिती स्थापन केली असून लवकरात लवकर बाधित मच्छिमारांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे एम.एम.आर.डी.ए. चे मुख्य अभियंता  ठुबे यांनी सूचित केले. त्यामुळे नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांना लवकरच नुकसान भरपाई पॅकेज मिळणार असल्याने कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी आ. म्हात्रे यांनी सांगितले की, नवी मुंबई शहर वसविण्याकरिता येथील स्थानिकांनी 100  टक्के जमीन शासनास दिलेली आहे. नवी मुंबईतील दिवाळे,करावे, सारसोळे, वाशी गाव येथील कोळी बांधवांचा पारंपारिक व्यवसाय हा मच्छीमाराचा असून कुटुंबाचा उदरनिर्वाह हा मासेमारीवर अवलंबून आहे. परंतु एम.एम.आर.डी ए. न्हावा शिवडी सी लिंक, कॉरीडोअर ब्रिजचे काम हे समुद्रातून असल्यामुळे मासेमारी करणार्‍या कोळी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  सदर  मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासन दरबारीपाठपुरावा करून प्रत्येक बाधित कोळी बांधवांसनुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करीत आहे. सदर नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी याकरिता एम.एम.आर.डी.ए. च्या संबंधित अधिकार्‍यांसह सकारात्मक बैठक संपन्न झाली आहे. मुख्य अभियंता यांनीही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळणार असल्याचे सूचित केले आहे. यावेळी डोलकर मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गणपत कोळी, खांदेवाले मच्छिमार संस्थेचे भाग्यवान कोळी, फगवाले संस्थेचे  अनंता बोस तसेच कोळी बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बाधित कोळी बांधवांना नुकसान भरपाई पॅकेज मिळणार असल्याने अनेक बोगस प्रतिनिधी मार्फत पैशांची मागणी होत आहे. अशा बोगस लोकांपासून सावध रहा. -आमदार मंदा म्हात्रे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply