सातारा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (दि. 6) उत्साहात झाला. या वेळी संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविद्यालयातील ‘रुसा’ पुरस्कृत इमारतीचे उद्घाटन मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड, उपप्राचार्य एल. एन. गाडके, अरुण बावळेकर, मंगेश भोसले, एस. एस. गाडगे, किशोर संकपाळ, उल्हास जाधव आदी उपस्थित होते. या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …