Breaking News

सोनू सूद करणार भारताचे नेतृत्व; विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

मुंबई ः प्रतिनिधी

गरीब, त्रासलेल्या आणि गरजूंना मदत करणारा बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने अलीकडेच आपला 48वा वाढदिवस साजरा केला. या वेळी त्याच्या चाहत्यांव्यतिरिक्त, जवळचे मित्र आणि बॉलीवूड स्टार्सनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यासह सोनूला त्याच्या वाढदिवशी विशेष ऑलिम्पिक वर्ल्ड विंटर गेम्सचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर पुढच्या वर्षी रशियात होणार्‍या या स्पर्धेत सोनू भारताच्या तुकडीचा भाग असेल. बातमीनुसार, सोनू सूदने भारताच्या खेळाडू आणि अधिकार्‍यांशी झालेल्या संभाषणादरम्यान याबाबत नुकतीच घोषणा केली आहे. सोनू म्हणाला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो. सोनू सूदने खेळाडूंशी संवाद साधताना त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. विशेष ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक प्रदेशाचा उपक्रम असलेल्या वॉक फॉर इन्क्लुजनसाठी खेळाडूंनी त्याची ओळख करून दिली.  ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सोनू सूद जानेवारीत रशियाच्या कझान येथे भारतातील खेळाडूंच्या संघाचे नेतृत्व करेल. बौद्धिक अपंग व्यक्तींसाठी ही सर्वांत मोठी जागतिक क्रीडा स्पर्धा आहे. ती दर दोन वर्षांनी होते. ही स्पर्धा पुढील वर्षी 22 ते 28 जानेवारीदरम्यान होणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply