Breaking News

पनवेल महापालिकेतर्फे विकासकामांचा धडाका

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून विविध विकासकामे सातत्याने करण्यात येत आहेत. या अंतर्गत तक्का, काळुंद्रे आणि वळवली येथे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 7) करण्यात आला. या समारंभांना महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती होती.
तक्का येथील स्मशानभूमी रस्त्याचे काँक्रीटीकरण व स्मशानभूमीचे सुशोभीकरण, काळुंद्रे येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि वळवली येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांच्या हस्ते पापडीचा पाडा आणि तळोजा-मजकूर येथील रस्त्याच्या कामांचा शुभारंभ झाला.
या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेचे प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अजय बहिरा, महादेव मधे, संतोष भोईर, नगरसेविका चारुशीला घरत, हेमलता म्हात्रे, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, माजी सरपंच संतोष पाटील, कोयनावेळचे माजी सरपंच निलेश कदम, शशिकांत शिर्के, संतोष चौधरी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply