उरण : दिनेश पवार
रणरणत्या उन्हाची पर्वा न करता सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा अमाप प्रतिसादात पार पडली. सभेतील एकूणच वातावरण बघता मावळमध्ये पुन्हा एकदा बारणेंच्या रूपाने भगवाच फडकणार हे निश्चित झाले. शिवसेनेला मिळणारी भाजप, रिपाइंची साथ आणि मतदारांना हवे हवे वाटणारे खासदार बारणे यामुळे उरणचे राजकीय वातावरणच महायुतीमय झाले आहे. सर्वांनाच उत्सुकता लागली आहे ती मतदानाची.