हिमांशू सहानी आणि सुभाष दिडवळ यांचा पुढाकार
अलिबाग : वार्ताहर
सामाजिक जाणिव आणि धार्मिक भावना यांची सांगड घालून अलिबागेतील हिमांशू सहानी व सुभाष दिडवळ यांनी स्वखर्चाने कुरुळ येथे दीपस्तंभ उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बुधवारी सकाळी कुरुळ येथील हनुमान मंदिरासमोर उपसरपंच स्वाती अरुण पाटील यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
हिमांशू सहानी हे गेली काही वर्षे अलिबागेत राहत आहेत. स्वतः ते धार्मिक वृत्तीचे असल्याने या कामातील आपल्या योगदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्या बरोबरच सुभाष दिडवळ यांच्यादेखील याच भावना आहेत.
या वेळी अवधूत पाटील, योगिता पाटील व मनाली पाटील, गाव कमिटीचे विठोबा पाटील, रमेश पाटील, नंदकुमार पाटील, आकाश पाटील, परवेज वाघेला, अनुप पाटील, गौरव भगत, ओंकार माळी, करण वाघेला, निलेश पाटील, प्रतीक पाटील, ओंकार पाटील आदी उपस्थित होते.