Breaking News

अबॅकस स्पर्धेत जयेशचे यश

मोहोपाडा : प्रतिनिधी

इंटरनॅशनल अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित स्पर्धेत चौकच्या जयेश समीर देशमुख याने बाजी मारली असून

त्याचे अभिनंदन होत आहे.

जयेश समीर देशमुख हा रिलायन्स फाऊंडेशन शाळेत पाचवीला आहे. सन 2019-20 अबॅकस व वेदिक या गणित विषयाच्या अभ्यासक्रमाची स्पर्धा पुणे येथील कर्मवीर भाऊराव पाटील, भारती विद्यापीठ कात्रज येथे घेण्यात आली. पुणे, मुंबई, नागपूर, हैद्राबाद, चेन्नई, दिल्ली व इराण-इराक, सौदीअरेबिया येथील एकूण 2200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. आयसिएमएएस मॅथ्य एबीएसियुएस या गणिताच्या धर्तीवर ही परीक्षा घेतली जाते. शौर्य शेट्टी, तनिष्का शेळके, संकल्प पाठक यांनी देखील यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना स्वप्ना पाठक यांचे मार्गदर्शन मिळाले. सुप्रसिद्ध उद्योजक नितीन देशमुख चौक परिसरातील शिक्षक, यांनी त्याचे अभिनंदन केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply