खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि नवनिमार्ण सेवाभावी संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच कोकण आगरी-कोळी महोत्सवाचे 7 ते 16 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख यांनी रविवारी
(दि. 16) भेट दिली.
या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक संतोष शर्मा, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दिपक शिंदे, नवनिमार्ण सेवाभावी संस्थेचे प्रसाद परब, मोना अडवाणी, विपुल चौतालिया, साधना पवार, अश्विनी भुवड, विनोद ठाकूर, हंसा पारघी, चांदणी अवघडे, अशोक जंगीड आदी उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या मनोगतामध्ये आयोजकांना शुभेच्छा दिल्या.