Breaking News

बेकायदेशीर होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर

नावडे-तळोजा गाव ते पेंधर फाट्यादरम्यान एकच फलक उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली असताना त्याठिकाणी अवाढव्य दोन फलक उभारण्यात येत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागासोबतच परवाना विभागाला याबाबत माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली.

नावडे-तळोजा रोडच्या बाजूला शालिमार हॉटेलजवळ  महामार्गालगत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून जाहिरात फलक लावण्यासाठी लोखंडी सांगाडे उभारण्याचे काम सुरू होते. लोखंडी फलक उभारण्यासाठी व जाहिरात प्रकाशित करण्यासाठी पालिकेच्या परवानगीची आवश्यकता असते, मात्र येथील एकाच जाहिरात फलकाला पालिकेची परवानगी देण्यात आली होती. दोन विनापरवानगी होर्डिंगचे काम चालू असल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती.

या तक्रारीनुसार एका होर्डिंगला परवानगी आहे व दोन होर्डिंग अनधिकृत होते. कटर मशीन आणि हायड्रामशीनच्या साह्याने अतिक्रमण विभागामार्फत ते तोडण्यात आले. या कारवाईदरम्यान उपायुक्त कैलास गावडे, प्रभाग अधिकरी जितेंद्र मढवी, अरविंद पाटील, कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply