Breaking News

पीडितेची प्रकृती गंभीर; अधिक उपचारासाठी मुंबईत हलवले

नाशिक : प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकात पेटवून देण्यात आलेल्या महिलेची प्रकृती गंभीर बनली असून, तिला अधिक उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी (दि. 15) नाशिक जिल्ह्याच्या दौर्‍यावर असतानाच ही दुर्दैवी घटना घडली होेती.

लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव येथील एका विवाहित महिलेला चार जणांनी पेट्रोल टाकून तिला पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित महिला गंभीर भाजली असून, तिला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र महिला 65 टक्क्यांहून अधिक भाजली असल्याने तिला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती गंभीर बनल्याने तिला पुढील उपचारांसाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. मसीना रुग्णालयात पीडितेवर सध्या उपचार सुरू आहेत.

हरामखोरांच्या मुसक्या आवळा : चित्रा वाघ

मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणाची पुनरावृत्ती नाशिकमध्ये घडली. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला असून, हरामखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारने उपयोजना करावी, अशी मागणी केली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विटरवर व्हीडिओ पोस्ट करीत म्हटले आहे की, पुन्हा एकदा अतिशय वेदनादायी घटना घडली आहे. लासलगावमध्ये महिलेला जिवंत जाळण्यात आले. गेल्या 15 दिवसांत ही सातवी घटना आहे. आपण कुठे चाललोयं, असा प्रश्नही वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply