Breaking News

आरोग्य महाशिबिरात 372 रुग्णांची तपासणी

पेण : प्रतिनिधी

येथील संकल्प चॅरिटेबल ट्रस्ट, कामोठे येथील एमजीएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमधील महात्मा गांधी मंदिरात घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य महाशिबिरात 372 रूग्णांची तपासणी करण्यात आली. पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्याधिकारी अर्चना दिवे, नगरसेविका ममता पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष गौतम पाटील, संतोष ठाकूर, मोनिका ठाकूर, दिपक लोके, रत्ना गोरी, संजय सिंग, धर्मेन्द्र सिंग, हेमंत सिंग, राजेश म्हात्रे, अभिजित म्हात्रे, ऋषिकेश  पाटील आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात कॅन्सर, हृदयरोग, मूत्रपिंड व मूत्र मार्ग विकार, मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, त्वचारोग, नेत्र-कान-नाक-घसा रोग आदी तपासण्या करण्यात आल्या. या वेळी पेण तालुका हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष मंगेश नेने व सचिव पी. एम म्हात्रे यांच्या हस्ते जलतरणपटू नील वैद्य याचा सत्कार करण्यात आला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply