Breaking News

‘सीकेटी’मध्ये रंगला अंतरंग कार्यक्रम

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर  (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे 13 आणि 14 फेब्रुवारीदरम्यान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियानांतर्गत आणि जिमखाना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी अंतरंग 2022-23 या महोत्सवाच्या माध्यमातून क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार प्रशांत ठाकूर, तसेच प्रमुख पाहुणे म्हमून रायगड भूषण व शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त क्रीडापटू संदीप गुरव, प्रसिद्ध गायिका श्वेता ठाकूर आणि प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रुचा मोडक, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर, कार्यालय अधीक्षक पी. एस. म्हात्रे, मुख्य लिपिक जी. के. सुर्वे, कला शाखा प्रमुख प्रो. डॉ. बी. एस. पाटील, प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. एम. ए. म्हात्रे, इतिहास विभाग प्रमुख डॉ. आर. डी. म्हात्रे, मराठी विभाग प्रमुख प्रा. आंबुलगेकर, एनसीसी विभागाच्या सीटीओ प्रा. नीलिमा तिदार आदी उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी, हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा असून, उत्साही वातावरणात साजरा होईल अशा शुभेच्छा दिल्या, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी, हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबविला जावा, असे सूचवून आयोजकांना व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी स्पर्धकांना या स्पर्धांचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाच्या दुसर्‍या दिवशी पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.(डॉ.) एस. के. पाटील, आय. क्यू.ए.सी.चे समन्वयक डॉ. बी. डी. आघाव, रुसा समन्वयक डॉ. एस. एन. वाजेकर, प्रो. डॉ. बी. व्ही. जाधव, भूगोल विभागप्रमुख डॉ.डी.एस. नारखेडे, कार्यालय अधीक्षक पी.एस.म्हात्रे यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये सांघिक खेळ, क्रिकेट, कॅरम, रस्सीखेच इ. तसेच गायन स्पर्धा, नाट्यस्पर्धा, मेहंदी,रांगोळी स्पर्धा अशाप्रकारच्या विविध स्पर्धा होत्या. क्रिकेटसाठी 16 संघ, रस्सीखेचसाठी आठ संघ तर सांस्कृतिक आणि इतर क्रीडास्पर्धेत 270 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी देशमुख यांनी केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक पी. के.गोंधळी, क्रीडा समन्वयक डॉ. व्ही. बी. नाईक, सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा डॉ. जी. एस. तन्वर, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, प्रा. अन्वेष वेमुला यांनी संयोजक म्हणून काम पहिले तसेच कमलाकर कणेकर, मिलींद साळवी, प्रल्हाद ठाकूर, तानाजी देशमुख, अस्मितक भगत, अभिजित ठाकूर, साईप्रसाद पाटील,  शरद सदावर्ते, राजाराम मळेकर, मिलिंद पाटील, लक्ष्मण वाघमारे आणि इतर सर्व कर्मचार्‍यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, संचालक परेश ठाकूर आदींनी कौतुक केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply