Breaking News

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केली आहे. पक्षात सक्रिय असणार्‍या अनेकांना या कार्यकारिणीत पदाधिकारी म्हणून संधी मिळाली आहे.
भाजपच्या संघटनात्मक निवडणुका झाल्या. त्यामध्ये बूथ अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्याचे दोन विभाग करण्यात आले. त्याप्रमाणे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पक्षाने जबाबदारी दिली. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यात जिल्हा उपाध्यक्षपदी वसंत भोईर, रामदास ठोंबरे, सुनील घरत, श्रीकांत पुरी, विठ्ठल मोरे, के. के. म्हात्रे, प्रल्हाद केणी, नीळकंठ घरत, जिल्हा सरचिटणीसपदी श्रीनंद पटवर्धन, दीपक बेहेरे, विनोद साबळे, संघटन सरचिटणीसपदी अविनाश कोळी, चिटणीसपदी शरद कदम, रमेश मुंडे, रमेश नायर, गीता चौधरी, अ‍ॅड. आशा भगत, तर कोषाध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  
महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अश्विनी पाटील, युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी मयुरेश नेतकर, अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रकाश बिनेदार, किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक गायकर, जिल्हा प्रकोष्ठमध्ये कामगार आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी जितेंद्र घरत, उत्तर भारतीय आघाडी जिल्हा संयोजकपदी डी. एन. मिश्रा, उद्योग आघाडी जिल्हा संयोजकपदी मंदार मेहंदळे, व्यापारी आघाडी जिल्हा संयोजकपदी अशोक ओसवाल, भटके-विमुक्त आघाडी जिल्हा संयोजकपदी बबन बारगजे, वैद्यकीय सेलच्या जिल्हा संयोजकपदी डॉ. बबन नागरगोजे, मच्छिमार सेलच्या जिल्हा संयोजकपदी गणेश नाखवा, सोशल मीडियाच्या जिल्हा संयोजकपदी प्रसाद मांडलेकर, माजी सैनिक सेलच्या जिल्हा संयोजकपदी समशेरसिंग जाखड, आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी काशिनाथ पारठे, तर ट्रान्सपोर्ट सेलच्या जिल्हा संयोजकपदी सुधीर घरत यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply