नगर : प्रतिनिधी
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबात इंदुरीकर महाराजांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
इंदुरीकर महाराजांनी महाराष्ट्रातील वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक-शिक्षिका, डॉक्टर, वकील व महिलावर्गाला उद्देशून पत्रक जारी केले आहे. या माफीनाम्यात त्यांनी म्हटले की, माझ्या अभ्यासानुसार मी काही वक्तव्य केले होते. त्याचा गेल्या आठ दिवसांपासून सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातून विपर्यास केला जात आहे. मी वारकरी संप्रदायाचा पाईक असून गेल्या 26 वर्षांपासून समाजप्रबोधनाचे आणि अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम करीत आहे. जाचक रुढी-परंपरा दूर होण्यासाठीही मी अथक प्रयत्न केले, मात्र माझ्या कीर्तनरुपी सेवेतील एका वाक्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यावरील प्रेम वृद्धिंगत व्हावे!
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …