Breaking News

पेण वाशी येथे श्रामणेर शिबिर उत्साहात

पेण : प्रतिनिधी

भारतीय बौध्द महासभेच्या वतीने पेण तालुक्यातील वाशी येथील लिंम्बिनी बुद्ध विहारात दहा दिवसांच्या श्रामणेर व बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात भन्ते सुमेध बोधी यांनी 14 उपासकांना ध्यान साधना देऊन मार्गदर्शन केले. या श्रामणेर शिबिराच्या सांगता समारंभाला महासभेचे राज्य कोषाध्यक्ष विजय कांबळे, जिल्हाध्यक्षा संपदा चव्हाण, सरचिटणीस विजय गायकवाड, नगरसेविका प्रतिभा जाधव, तालुकाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, संतोष गायकवाड, राजेश भालेराव, मारुती शिंदे, सचिन कांबळे, राहुल कांबळे, राम जाधव, सुनिल कांबळे आदी पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. शिबिरार्थींनी समाजाच्या उन्नतीसाठी धम्माच्या कार्याचा अभ्यास करावा, असे  आवाहन संपदा चव्हाण यांनी या वेळी केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply