आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून पाहणी
पेण : प्रतिनिधी
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पालीजवळील वावळोली येथे 100 बेडच्या कोविड-19 केअर सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी जागेची पाहणी केली.
या पाहणी दौर्यात पालीचे तहसीलदार दिलीप रायन्नवार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मपारा, तालुकाध्यक्ष दादा घोसाळकर आदी उपस्थित होते. या वेळी कोविड केअर सेंटर उभारणीसाठी कोणकोणत्या साधनांची गरज लागणार आहे तसेच कोणत्या उपाययोजना करावयास लागतील या विषयी चर्चा करण्यात आली. आमदार रविशेठ पाटील यांनी अधिकारीवर्गाला आवश्यक त्या सूचना दिल्या.