Breaking News

नागोठणे मीरानगरातील अतिक्रमणे वनखात्याकडून जमीनदोस्त

नागोठणे : प्रतिनिधी

येथील मिरानगर भागातील वन खात्याच्या जागेत करण्यात आलेले अतिक्रमण संबंधित विभागाच्या पथकाने गुरूवारी (दि. 20) सकाळी जमीनदोस्त केली.  कोकण रेल्वे मार्गाच्या पलिकडे नागोठणे ग्रामपंचायत अंतर्गत मिरानगर वसले आहे. येथील बहुतांशी जागा वन विभागाच्या मालकीची असली तरी, मागील तीस चाळीस वर्षांपासून काही भू माफियांच्या आशीर्वादाने याठिकाणी अतिक्रमणे फोफावली आहेत. वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर यांच्या सूचनेनुसार नागोठणे बिट अधिकारी वसंत जाधव, कानसई बिटचे सुहास रणावरे, वनरक्षक अनिल नाईक यांच्यासह कर्मचारी आणि वनमजूर या पथकाने गुरूवारी सकाळी धडक कारवाई करीत सर्वे नं. 207 अ मध्ये घरासाठी बांधण्यात येत असलेला जोता उध्वस्त केला.

वन खात्याच्या जागेत अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास ते तातडीने उध्वस्त करावे, असे आदेश संबंधित बिट अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्यात आले असून, त्या अनुषंगाने मिरानगर परिसरात चालू झालेले बांधकाम गुरुवारी सकाळी तोडले आहे.

-किरण ठाकूर, वन परिक्षेत्र अधिकारी, नागोठणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply