मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. 20) करण्यात आले. हा सोहळा संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा तसेच परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय उच्चत्तर शिक्षण अभियान अर्थात ‘रुसो’चे सहसंचालक प्रमोद पाटील, सेंट झेविअर्स कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. राजेंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, संजय भोपी, नगरसेविका सितातार्ई पाटील, संस्थेचे सचिव सिद्देश्वर गडदे, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत बर्हाटे, एक. के. पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.