Breaking News

विद्यार्थ्यांना आरोग्यदायी भेटवस्तूंचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी

वाशिवली येथील डॉ. पारनेरकर महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आणि हायटेक कार्बन बिर्ला कंपनी पाताळगंगा यांच्याकडून दहावी व बारावी बोर्ड परीक्षार्थिंना शुभेच्छा व आरोग्यदायी भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाला कंपनीचे सामाजिक विकास अधिकारी लक्ष्मण मोरे, प्रभारी प्राचार्य विष्णू चेंडगे, पाटील मॅडम उपस्थित होते. या वेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना घवघवीत यश संपादन करून आपल्या शाळेचे, शिक्षकांचे व आई-वडीलांचे नाव रोशन करा, असे आवाहन केले. नेहमीच बिर्ला कंपनीच्या माध्यमातून व्यवस्थापक प्रकाश देसाई व जीवन कला मंडळाचे अध्यक्ष तुळसीदास पाटील शाळेसाठी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करीत असतात. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवन कला मंडळाचे कोषाध्यक्ष डॉ. ए. आर. पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन मंडळाचे सहचिटणीस प्रा. एम. वाय. सोनवणे यांनी केले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply