Breaking News

बंदीनंतरच्या पहिल्याच सामन्यात घेतली हॅट्ट्रिक!

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने 107 धावांनी विजय मिळवला. अ‍ॅश्टन अ‍ॅगर ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा हीरो ठरला. त्याने हॅट्ट्रिकसह पाच विकेट्स घेतल्या. 2018मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी अ‍ॅगरवर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो प्रथमच मैदानात उतरला आणि त्याने कमाल केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने कर्णधार अ‍ॅरोन फिंच (42), स्टिव्ह स्मिथ (45) यांच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 196 धावा केल्या.
विजयासाठी 197 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकेला अ‍ॅगरने एकापाठोपाठ एक धक्के दिले. त्याने आठव्या षटकात चौथ्या चेंडूवर फाफ डू प्लेसिस (24)ची विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर अँडिल फेहलुक्वायो याला शून्यावर आणि सहाव्या चेंडूवर डेल स्टेन याची विकेट घेत हॅट्ट्रिक साजरी केली.
टी-20 क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा अ‍ॅगर हा दुसरा ऑस्ट्रेलियन गोलंदाज ठरला आहे, तर टी-20च्या इतिहासात 13वा गोलंदाज आहे. अ‍ॅगरच्या फिरकी गोलंदाजीमुळे आफ्रिकेचा संघ 89 धावांवर गारद झाला. यासोबतच टी-20 क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. याआधी नोव्हेंबर 2018मध्ये त्यांचा पराभव झाला होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply