Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या मंडळातर्फे ज्येेष्ठांसाठी काशी यात्रा

उरण : वार्ताहर : आमदार महेश बालदी यांच्या उरण येथील महेश बालदी मित्र मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी काशी यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा शनिवारी (दि. 22) सुरु झाली असून शुक्रवार (दि. 28) पर्यंत प्रवास असेल.

उरण विधानसभा मतदार संघातील उरण पूर्व भागातील साई, केळवणे, वशेणी, पुनाडे, सारडे, आवरे, कडापे, पिरकोन, पाणदिवे, खोपटे, कोप्रोली, कळंबूसरे, चिरनेर, मोठीजुई, तारा, गोवठणे आदी गावातील जेष्ठ नागरिकांनी कशी यात्रेत सुमारे 1200 ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग घेतला असून या यात्रेत मथुरा, वृंदावन, आयोध्या, शरयू नदी, श्री राम मंदिर, वाराणसी, काशी विश्वेश्वर दर्शन, गंगा नदी दर्शन, गंगा आरती सोहळा, दशमेष घाट पर्यटन, अलाहाबाद (प्रयागराज) त्रिवेणी संगम आदी तिर्थक्षेत्र यात्रेकरू पाहणार आहेत.

काशी यात्रेत आमदार महेश बालदी, उरण नगरपरिषद उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक नंदु लांबे, नगरसेवक धनंजय कडवे, माजी नगरसेवक राजेश कोळी, माजी नगरसेवक नवीन राजपाल, मदन कोळी, सुनील पेडणेकर, उदयोजक राजा पडते व कार्यकर्ते आदी सोबत आहेत.

तसेच या वेळी आमदार महेश बालदी यांच्या पत्नी निता महेश बालदी, भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, सुभाष गोवारी यांनी मुंबई (कुर्ला टर्मिनल) येथे  यात्रेकरूंना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply