Breaking News

माणिकगडावर संवर्धन मोहीम

पनवेल, ठाण्याच्या शेकडो दुर्गप्रेमींचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त

छत्रपती संभाजीराजेंच्या बलिदान मासानिमित्त माणिकगडावर संवर्धनाचे जोरदार काम सुरू आहे. पनवेल तसेच ठाण्यामधील संस्था एकत्र येऊन माणिकगडाचे संवर्धन करीत आहेत. रविवारी (दि. 23) माणिकगडावर 19वी संवर्धन मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एकूण 72 गड-दुर्गप्रेमी मावळे सहभागी झाले होते. ठाण्यातील स्वराज्याचे वैभव आणि माऊली प्रतिष्ठान, तर पनवेलमधून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, पनवेल आणि राजे शिवराय प्रतिष्ठान, पनवेलचे धारकरी या मोहिमेत सहभागी होते. सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींनी संवर्धन कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माणिकगड संवर्धन समितीतर्फे करण्यात आले आहे. यासाठी संपर्क ः ठाणे-अमित बदे-9819381475, पनवेल-विक्रम पाटील-8652855191, संकेत भोसले- 8408040808.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply