मुरुड : प्रतिनिधी
येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील मराठी विभागामार्फत गुरुवारी मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदी राष्ट्रभाषा असली तरी मराठी ही राजभाषा आहे. तिला ज्ञानभाषा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ. चव्हाण यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीशैल बहिरगुंडे यांनी केले. त्यांनी जागतिक मराठी भाषा दिनाविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. डॉ. जनार्दन कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाचे डॉ. नारायण बागुल, डॉ जनार्दन कांबळे, डॉ. मुरलीधर गायकवाड, प्रा. डी. आर. रौदळ, डॉ. सीमा नाहिद, प्रा. अनुप सिंग, ग्रंथपाल गजानन मुनेश्वर यांच्यासह विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.