Breaking News

प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेची जाहीर सभा

स्थानिकांना न्याय मिळाला पाहिजे -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
चिंध्रण, महाळुंगी, कानपोली प्रकल्पग्रस्त बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे शुक्रवारी (दि. 26) चिंध्रण येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला स्थानिक नागरिक, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.
या सभेत बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, अतिरिक्त तळोजा एमआयडीसीसाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत त्या स्थानिकांना योग्य नोकर्‍या, छोटे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे अशीच सर्वांची मागणी आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे तसेच त्यांचे हक्क अबाधित राहणे आवश्यक आहे.
आपल्या भाषणातून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या अधोरेखित करत स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देणे याला प्राधान्य दिले जाईल तसेच तिन्ही गावांच्या वतीने एक संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. या बैठकीला सर्व पक्षांचे नेते आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने हजर होते.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply