Breaking News

प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदींनी केले तीन जागतिक विक्रम

प्रयागराज : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 29) केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रयागराज येथील एका भव्य कार्यक्रमात उपस्थित राहिले. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 26 हजार 791 दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त उपकरणांचे वाटप केले. या वेळी पंतप्रधानांनी तीन जागतिक विक्रमदेखील केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांना सन्मान देण्याचे काम केले, अशा शब्दांत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधानांचा गौरव केला. त्यांनीच अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग हा शब्द दिला. अशा प्रकारे पहिल्यांदाच एकाच वेळी हजारो दिव्यांगांना उपकरणांचे वाटप करण्यात येत आहे, असे योगी आपल्या भाषणात म्हणाले. पहिला जागतिक विक्रम आहे हँड ऑपरेटेड ट्राय सायकलींच्या सर्वात मोठ्या परेडचा. यात 300 ट्राय सायकलींची परेड केली गेली. हा एक जागतिक विक्रम आहे. दुसरा जागतिक विक्रम पंतप्रधानांच्या उपस्थितीत एका तासामध्ये सर्वाधिक दिव्यांगांना हॅण्ड ऑपरेटेड ट्राय सायकल वितरणाचा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका तासात 600 ट्राय सायकली वितरित केल्या.तिसरा जागतिक विक्रम व्हीलचेअरच्या सर्वात लांब रांगेचा आहे. यात 400 व्हीलचेअर एका रांगेत दोन किमी अंतर धावल्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply