Breaking News

खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर

तीन लाखांपेक्षा जास्त भक्तांनी घेतला लाभ; समागमातील लंगर व्यवस्थापनाची सर्वत्र चर्चा

Largest anchor nationwide filled with Kharghar | खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर
खारघरमध्ये भरले देशभरातील सर्वात मोठे लंगर


संत समागमाचे आयोजन मागील अनेक वर्षांपासून खारघर याठिकाणी केले जाते. समागमात देशभरातील अनुयायी सहभागी होतात. तीन दिवस विविध कार्यक्र म याठिकाणी पार पडत असतात. यामध्ये भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्र म, रक्तदान शिबिर आदींसह सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात येते.

पनवेल : खारघरमधील सिडको मैदानात आयोजित करण्यात आलेल्या ५२ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता सोमवारी झाली. देशभरातील लाखो भक्तगण यावेळी सहभागी झाले होते. उत्तम नियोजन व व्यवस्थापन असलेल्या समागमातील लंगर (जेवण व्यवस्थापन) यावेळी चर्चेचा विषय ठरला.


लाखोंच्या संख्येने भक्तगणांच्या जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी लंगरमध्ये केली जाते. सुमारे दहा एकर परिसरात हे लंगर असून मोफत जेवण दिले जाते. चपाती (फुलका), सब्जी (भाजी), भात, डाळ , लोणचे या पदार्थांचा जेवणात समावेश असतो. २४ तास हे लंगर सुरू असते. २४ मोठ्या कढईच्या साहाय्याने जेवण तयार केले जाते. दरवर्षी भक्तगणांमध्ये वाढ होत असून देशभरातील सर्वात मोठा लंगर याठिकाणी समागमाच्या काळात सुरू असतो.

लंगरचे व्यवस्थापन
दहा एकरमध्ये पसरलेल्या लंगरमध्ये एका वेळेला १८ हजार व्यक्ती एका पंगतीत बसतात. सुमारे २४ कढयांमध्ये भाज्या, भात तयार केले जातात. प्रत्येक कढईची क्षमता ६०० किलोग्रॅम इतकी असते.
याशिवाय १६ तव्यांवर एकाचवेळी २० महिलांच्या मार्फत चपात्या केल्या जातात. लंगर नियोजनासाठी दीड हजार स्वयंसेवक याठिकाणी कार्यरत होते, अशी माहिती लंगर व्यवस्थापक अशोक केरेकर यांनी दिली.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply