Breaking News

नेरळमध्ये अष्टविनायक टॅक्सी संघटनेच्या स्टॅण्डचे उद्घाटन

कर्जत : बातमीदार

नेरळ एसटी स्थानकातून कळंब, वांगणी या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी सेवा देण्याकरिता नव्याने टॅक्सी स्टँड स्थापन करण्यात आले. या अष्टविनायक टॅक्सी स्टँडचे उद्घाटन ज्येष्ठ वाहतूक हवालदार सुभाष पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

अष्टविनायक टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संतोष भोईर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी जि.प. चे माजी सदस्य सावळाराम जाधव, कर्जत पं.स. सदस्या सुजाता मनवे, ग्रामपंचायत सदस्य केतन पोतदार, स्थानिक कार्यकर्ते मिलिंद विरले, महेश विरले, दिनेश कालेकर, स्टँड प्रमुख केशव तरे, उपाध्यक्ष रमेश विरले, सचिव संजय दभडे, संघटना सल्लागार समाधान लिये, नामदेव राणे, हनुमान राणे, नंदलाल शिंगटे आदी पदाधिकारी, तसेच पोलीस कर्मचारी आशिष कराळे, शरद फरांदे, राहुप मुनेश्वर, नीलेश वाणी, समीर भोईर उपस्थित होते. यावेळी कळंब आणि वांगणी येथील स्टँडचेही उद्घाटन करण्यात आले.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply