Breaking News

प्रतिकार्ड 35 किलो धान्य द्या

रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची मागणी

अलिबाग ः प्रतिनिधी

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना वितरणाचे प्रमाण वाढून अंत्योदय योजनेसाठी दरमहा 35 किलो धान्य प्रतिकार्ड व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींसाठी चार किलो तांदूळ व एक किलो गहू प्रतिव्यक्ती देण्यात यावेत, अशी मागणी अलिबाग तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

अलिबाग तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके आणि अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अलिबाग तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संजय कामेरकर, उपाध्यक्ष सुभाष वागळे, सचिव रवींद्र सावणेकर, खजिनदार कौस्तुभ जोशी, सदस्य भगवान पिंगळे, परदेशी, थळे, राजेंद्र पाटील, देवेंद्र तांबोळी, अमृता ठोंबरे तसेच तालुक्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार या वेळी उपस्थित होते. अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी साधारणतः 40 टक्के पीक हाती आले. काही शेतकर्‍यांचे 100 टक्के नुकसान झाल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम 2013मधील निकषानुसार उत्पन्न मर्यादेनुसार देण्यात आलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना किमान दोन वर्षे तरी प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी योजनेमध्ये समाविष्ट करून या योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी अलिबाग तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply