Breaking News

केदार भगत यांच्या रुग्णवाहिकेचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे युवा नेते केदार भगत यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि गणपती आरती संग्रहाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले.

या कार्यक्रमास सचिन भगत, राजेंद्र भगत, सुमित दसवते, प्रशांत शेटे, राजे प्रतिष्ठानचे केवल महाडिक, भाजप शिववाहतूक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्ता केंद्रे, नितेश भगत, गौरव सावंत, हर्षद गडगे, योगेश साळवी, शेषनाथ गायकर, अजित सिंग, रवी परचे, मितेश भोपी, संकेत दसवते, अनिल पोशिलकर, संतोष वर्तले, भावेश शिंदे, संतोष धागे, आनंद गुरव, इस्माईल,

चेतन डुकरे, चिन्मय भगत, यज्ञेश पाटील, निहाल पाटील, ब्रिटिश बहिरा, अविनाश जालान, संजय कदम आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, केदार भगत हा वर्षभर असे सामाजिक उपक्रम राबवित असतो. तरुणांमध्ये त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्याची हातोटी आहे. कोणताही फायदा न बघता काम करण्याच्या वृत्तीमुळे निःस्वार्थी कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख झाली आहे. त्याने हे कार्य असेच सुरू ठेवावे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply