Breaking News

विसपुते महाविद्यालयात मराठी दिन व विज्ञान दिनानिमित्त उपक्रम

पनवेल : प्रतिनिधी : आदर्श शैक्षणिक समूह संचलित श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी. एड्. महाविद्यालयात शनिवारी (दि. 29) मराठी भाषा दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या वेळी ग्रंथालयात मराठी व विज्ञान विषयावरील विविध पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते.

शनिवारी विज्ञान दिनानिमित्त आदर्श समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बापूसाहेब डी. डी. विसपुते बी.एड्. महाविद्यालयात मराठी भाषा दिन व विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या वेळी पुणे येथील पर्यावरण क्षेत्रात विशेष कार्य करणारे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी हस्तलिखित व मराठी आणि विज्ञान मंडळाचे उद्घाटन केल्यावर पर्यावरणाची हानी करणार्‍या कचर्‍याचे विविध प्रकार, ते वेगळे करण्याच्या पद्धती व यातील युवकांची भूमिका स्पष्ट करीत यावर आधारित एक मोबाइल गेमदेखील सर्वांना शिकवला. त्याचबरोबर त्यांनी कचर्‍यावर तयार केलेले विविध कार्टून्स दाखवत सर्वांना एक वेगळा वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. या वेळी त्यांच्या हस्ते मराठी व विज्ञान विषयावरील विविध पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करून ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा कांबळे यांनी मराठी व विज्ञान दिनाचे महत्त्व विशद करीत सर्वांना एक नवी दिशा दिली. मराठी भाषा दिन व विज्ञान दिन हे अनेक ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीने साजरे केले जातात, पण विसपुते बी. एड्. महाविद्यालयाने मात्र विद्यार्थ्यांना या दिनाचे औचित्य साधून कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन व वृक्ष लागवडीचा एक नवा दृष्टिकोन दिला.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply