मुंबई : प्रतिनिधी
ओम कबड्डी प्रबोधिनीच्या वतीने 25 मार्च रोजी गुडीपाडव्याच्या दिवशी होणारा 17वा वर्धापन दिन सोहळा कोरोना व्हायरस संसर्गाच्या निमित्ताने पुढे ढकलण्यात आला आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांनी उत्कृष्ट खेळ करून महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी अतुलनीय योगदान दिले अशा मुंबईतील ज्येेष्ठ पुरुष व महिला खेळाडूंना गौरविण्यात येते. त्यांची व त्यांच्या खेळाची महती नवोदित खेळाडूंना करून देण्यात येते.
शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रबोधिनीच्या कार्यकारी मंडळाने हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमाच्या पुढील तारखा परिस्थितीचा अंदाज घेऊन लवकरच कळविण्यात येतील. याची नोंद सर्व सदस्य, सन्मानित ज्येष्ठ खेळाडू, हितचिंतक व कबड्डीप्रेमी यांनी घ्यावी, असे प्रबोधिनीचे सचिव जीवन पैलकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वरे कळविले आहे.
दरम्यान, कोरोनामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत.
Check Also
शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …