Breaking News

जेएसडब्ल्यू कंपनीत सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन

रेवदंडा : प्रतिनिधी 

राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्ताने साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीत बुधवारी (दि. 4) कंपनीच्या अग्नीशामक व सुरक्षा विभागाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच सुरक्षा साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कंपनी हेड पंकज मलिक यांच्या हस्ते झेंडा फडकवून या कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीने गेेले दोन वर्ष अपघाताची संख्या शून्य राखण्यात यश प्राप्त केले असून, यापुढे सुध्दा सुरक्षितता राखण्याचा मनोदय त्यांनी या वेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदिप ढापरे यांनी केले. या वेळी कर्मचार्‍यांना सुरक्षेविषयक शपथ देण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अग्नीशामक व सुरक्षा विभागाच्या वतीने  घोषवाक्य, प्रश्नमंजूषा, भिंतीपत्रके, तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना पंकज मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी कंपनीतील अधिकारी व कामगार उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कंपनीच्या अग्नीशामक व सुरक्षा विभागाचे प्रमुख संदिप ढापरे व अनिल राईलकर यांच्यासह अग्नीशामक दलातील कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply