Breaking News

अॅड. मनोज भुजबळ यांची राम मंदिर निर्माणासाठी देणगी

एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्द

पनवेल : प्रतिनिधी

अयोध्येत उभारण्यात येणार्‍या भव्य राम मंदिर निर्माणासाठी शनिवारी (दि. 16) पनवेल तालुका अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानाच्या जिल्हा प्रमुख अश्विनी गाडगीळ यांच्याकडे सुपूर्द केला.

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका यांची शनिवारी चिंतामणी हॉल पनवेल येथे श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान मार्गदर्शन बैठक झाली. या वेळी संघाचे अविनाश कोळी, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते. या वेळी अश्विनी गाडगीळ (अभियानाच्या जिल्हा प्रमुख) व अ‍ॅड. दिपक गायकवाड (अभियानाचे जिल्हा पालक) यांनी उपस्थित वकील वर्गास मार्गदर्शन केले.

हिंदू धर्माची अस्मिता ठरणार असलेल्या या भव्य मंदिर निर्माणात माझेही काहीतरी योगदान हवे, ही भावना प्रत्येकात जागविण्याच्या हेतूने हे निधी संकलन अभियान सुरू करण्यात आलेले असून यात कमीतकमी 10 रुपयांपासून कितीही निधी रोख/धनादेश/एनइएफटी स्वरूपात देता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply