नगरसेवक बबन मुकादम यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
महानगरपालिकेचे नगरसेवक बबन मुकादम यांचा वाढदिवस बुधवारी (दि. 1) सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त कळंबोलीमध्ये रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईच्या माध्यमातून मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन बबन मुकादम यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजप नेते शशिकांत शेळके, विजय गर्गे, रमेश पनवेलकर, बाळासाहेब शिंदे, पवन पवार, पांडूरंग केंगार, किसन कदम, संतोष गायकवाड, संदिप भगत, प्रिया मुकादम, दत्तात्रेय फरदे, प्रकाश मुंबईकर, तुषार मुंबईकर, कमल कोठारी, सोमनाथ बोबडे, अजित फरदे, विद्या फरदे, संजिवनी मुंबईकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.