Breaking News

चिरनेर हद्दीतील वणव्यांमध्ये वनसंपदा होतेय खाक

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिरनेर हद्दीतील बेलडोंगरी, बापूजीदेव परिसरातील डोंगरांना आगी लागून झाडेे-झुडप आगीत खाक झाली आहेत. यामध्ये पक्षाची घरडी अंडी छोटे-छोटे पक्षी होरपळून उध्वस्त झाले आहेत. मात्र वनविभागाच्या अधिकार्‍यांकडून या लागलेल्या आगीकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र शासनाकडून पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रात 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून उरण तालुक्यात कलंबूसरे डोंगरपरिसर, चिर्ले डोंगरपरिसर तसेच चिरनेर डोंगरपरिसर या भागात वृक्ष लागवड करण्यात आली होती. राज्य सरकारने या वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र अशाप्रकारे आगी लागून हे राज्य सरकारच्या म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे. या बेलडोंगर, बापूजीदेव डोंगर परिसरात दोन दिवस आग लागून सुध्दा एकही या परिसरातील वनपाल, वन अधिकारी आग विझविण्यासाठी फिरकले सुद्धा नाहीत. ही मोठी शोकांतिका असून निसर्ग मित्राकडून खंत व्यक्त होत आहे. उरण तालुक्यात अनेक प्रकल्प निर्माण झाल्यामुळे लाखो वाहने दिवसभरात चालू लागली त्यामुळे या परिसरात प्रदूषणयुक्त वातावरण पसरले होते. झाला आहे. त्यातच उरणच्या पूर्व भागात उरले सुरलेली डोंगरे जंगले त्यांनाही आगी लागल्याने आणखीही प्रदूषण वाढले जाणार असल्याचा धोका निर्माण झाला आहे. आज वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढ लागले आहे. त्यामुळे पाण्याचा ही अंश कुठे दिसेनासा झाला आहे. पक्षी प्राणी स्थलांतरित करू लागले आहेत. पक्षाच्या जाती ही नष्ट होत चालल्या आहेत आणि अशा प्रकारच्या आगी लागल्यामुळे तर पक्षी जातच नष्ट होईल आणि पुढच्या पिढीला फोटोद्वारे दाखविण्यात येण्याची वेळ येईल. राज्य सरकारकडून निसर्ग वाचविण्यासाठी वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहे. मात्र ज्यांच्यावर तालुक्यातील जंगले वाचविण्याची धुरा ज्यांच्यावर दिली आहे ते मात्र झोपलेल्या अवस्थेत आहेत. त्यांनी जर याकडे लक्ष दिले किंवा वाड्या वस्त्यांवर जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली तर ह्या आगी लागणे नक्कीच थांबेले, मात्र दरवर्षी या परिसरात आगी जागून सुद्धा वनविभाग निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात उरण वनविभागाचे तालुका अधिकारी शशांक कदम व वनक्षेत्रपाल राऊत राय यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता, होऊ शकला नाही.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply