Breaking News

दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध; 39 अर्ज अवैध

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात होणार्‍या 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन हजार 436 उमेदवारी अर्ज वैध, तर 39 अर्ज अवैध ठरले आहेत. महाड, माणगाव या दोन तालुक्यांमध्ये एकही उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरला नाही. महाड तालुक्यात 93, तर माणगावमध्ये 79 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ते सर्व वैध ठरले आहेत.
15 जानेवारी रोजी 88 ग्रामपंचायतींमध्ये मतदान होणार आहे. 311 प्रभांमधून 840 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी एकूण दोन हजार 475 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 39 अर्ज छाननीमध्ये अवैध, तर दोन हजार 436 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. रायगड जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अलिबाग तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या 38 सदस्यपदांसाठी 140 अर्ज दाखल करण्यात आले. त्यापैकी तीन अर्ज अवैध ठरल्यानंतर 137 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. पेण तालुक्यात 181 अर्ज दाखल झाले. त्यापैकी दोन अर्ज अवैध, तर 179 अर्ज वैध ठरले आहेत. कर्जत तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील 89 सदस्यपदांसाठी 297 अर्ज सादर करण्यात आले. छाननीत पाच अर्ज अवैध ठरल्याने 292 अर्ज वैध झाले.
रोहा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींमधील 191 सदस्यपदांसाठी 607 दाखल अर्जांपैकी नऊ अर्ज अवैध ठरविण्यात आल्यानंतर 598 अर्ज वैध ठरले आहेत. माणगाव तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील 47 सदस्यपदांसाठी 79 दाखल अर्जांपैकी सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले. महाड तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमधील 47 सदस्यपदांसाठी 93 दाखल अर्जांपैकी सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले. श्रीवर्धन तालुक्यातील चार ग्रामपंचायतींमधील 36 सदस्यपदांसाठी दाखल 97 अर्जांपैकी एक अर्ज अवैध ठरल्यानंतर 96 अर्ज वैध ठरले.
म्हसळा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमधील 27 सदस्यपदांसाठी 43 पैकी एक अर्ज अवैध ठरल्यानंतर 42 अर्ज वैध ठरले आहेत. पनवेल तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींमधील 228 सदस्यपदांसाठी 691 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सात अवैध, तर 684 अर्ज वैध ठरले आहेत. उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमधील 70 सदस्यपदांसाठी 247 अर्ज दाखल झाले होते. त्यातील 11 अर्ज अवैध, तर 236 वैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जानेवारी आहे. त्यानंतर निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply