Breaking News

उरण तालुका भाजप कार्यकर्ता-पदाधिकारी मेळावा उत्साहात

उरण ः प्रतिनिधी

भाजप उरण तालुका कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा रविवारी (दि. 8) जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल येथे उत्साहात झाला. या वेळी बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच (शेकाप) मानसी देवेंद्र पाटील आणि बोकडवीरा ग्रामपंचायत सदस्य शेखर भास्कर पाटील यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

येथील कार्यकर्त्यांच्या बळावर व मेहनतीमुळेच मी आमदार म्हणून निवडून आलो. प्रत्येक कार्यकर्ता हा आमदार आहे. जेएनपीटीच्या सीएसआर फंडातून वीर वाजेकर कॉलेजसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. त्यासाठी माझे प्रयत्न असतील. कार्यकर्त्यांचे माझ्यावर प्रेम आणि विश्वास असल्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही मी विजयी झालो, असे प्रतिपादन उरणचे भाजप आमदार महेश बालदी यांनी या वेळी केले.

खोपटे गाव सरपंच विशाखा ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी खोपटे शाळेसाठी डी. पी. वल्डकडे साडेचार कोटींचा प्रस्ताव टाकला होता. त्यासाठी मी प्रयत्न करून तो मंजूर करून घेतला. घारापुरीत लाईट आणली.

शिवस्मारक उभारण्याचे काम त्याचप्रमाणे करंजा येथे बंदराचे कामही लवकरच पूर्ण होईल. कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळेच भाजपमध्ये दिवसेंदिवस इतर पक्षीय कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच आहे. आजच्या मेळाव्यात ज्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या ते कार्यकर्ते चांगल्या प्रकारे काम करतील, असा विश्वासही आमदार महेश बालदी यांनी या वेळी व्यक्त केला. भाजपत प्रवेश केलेल्या बोकडवीरा ग्रामपंचायत सरपंच (शेकाप) मानसी देवेंद्र पाटील यांची उरण तालुका सरचिटणीसपदी, तर बोकडवीरा ग्रामपंचायत सदस्य शेखर भास्कर पाटील यांची उरण तालुका युवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या वेळी आमदार महेश बालदी, भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष सुधीर घरत, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकात घरत, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा,  रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनीताई पाटील, रायगड जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संगीता पाटील, रायगड जिल्हा सरचिटणीस मृणाल खेडकर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका सरचिटणीस दीपक भोईर, उरण तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, प्रकाश ठाकूर आणि भूपेंद्र घरत तसेच महालन विभागप्रमुख महेश कडू, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका प्रियंका पाटील, रजनी कोळी, जान्हवी पंडित, नगरसेवक नंदू लांबे, नगरसेविका आशा शेलार, स्नेहल कासारे, यास्मिन गॅस, उरण शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, शेखर तांडेल, फुंडे सरपंच जयवंती म्हात्रे, जसखार सरपंच दामूशेठ घरत, परशुराम म्हात्रे, खोपटे सरपंच विशाखा ठाकूर, बोकडवीरा ग्रामपंचायत सदस्या सुचिता पाटील, चिरनेर विभाग अध्यक्ष शशी पाटील, पणजे सरपंच हरेश्वर भोईर, जसीन गॅस, दिनेश

तांडेल, प्रकाश कडू, मिलिंद पाटील, नंदकुमार तांडेल, हरेश तांडेल, चंद्रकांत कडू, प्रा. प्रमोद म्हात्रे तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply