पनवेल ः बारापाडा ते कर्नाळा नाका या परिसरात वीटभट्टी मालकांनी अनधिकृतपणे केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या परिसरातील सुमारे तीनशे एकर भातशेतीची जमीन पाण्याखाली आहे. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ही जमीन पडिक आहे.