उरण : प्रतिनिधी
उरण तालुका भाजपच्या पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असून भाजपच्या महिला कमिटी तालुकाध्यक्ष पदी अॅड. राणी सुरज म्हात्रे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने महिला वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
भाजप पदाधिकार्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्याचे धोरण पक्षाने सुरू केले आहे. पक्षातील इतर कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी अनेक नवोदितांना पक्षाच्या पदाधिकारी म्हणून संधी दिली आहे. उरण पूर्व भागातील गोवठणे गावात पक्षाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार्या राणी म्हात्रे यांना भाजपच्या वरिष्ठांनी महिला कमिटीच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
उच्चशिक्षित असणार्या राणी म्हात्रे या गोवठणे, आवरे परिसरात महिला बचत गट, महिला मंडळे यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतात. त्यामुळे महिला वर्गाच्या आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडून तालुक्यातील समस्त महिला वर्गाला न्याय देईन असा विश्वास राणी म्हात्रे यांनी व्यक्त केला. नियुक्तीच्या वेळी भाजप महिला कमिटी जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, आमदार महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, भाजप जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, भाजप तालुकाध्यक्ष रवी भोईर, भाजप महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, संगीता पाटील, भाजप शहर अध्यक्ष कौशिक शहा आदी उपस्थित होते.