Breaking News

लोकशाहीचा उत्सव साजरा करा

मतदानाचा हक्क बजावण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मतदानासाठी आता महिनाभरापेक्षा कमी काळ उरला आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मतदारांना, विशेषतः तरुणाईला ब्लॉगद्वारे आवाहन केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी, मतदान हे महत्त्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत आपले मत महत्त्वपूर्ण असते. मतदानाचा हक्क बजावून आपण देशाचे स्वप्न आणि अपेक्षा पूर्ण करण्यात योगदान देत असतो, असे ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

मतदान ओळखपत्र प्राप्त करणे आणि मतदानाचा हक्क बजावणे ही अभिमानास्पद बाब आहे असे सांगून पंतप्रधान मोदींनी आपल्या सर्वांचा उत्साह द्विगुणीत व्हावा. विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणार्‍यांनी हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. मतदान न करणार्‍यांना पश्चाताप होईल असे वातावरण तयार करा, असेही त्यांनी म्हटले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply