नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ट्वेन्टी-20 मालिका जिंकून न्यूझीलंड दौर्याची धडाकेबाज सुरुवात केल्यानंतर वनडे आणि कसोटी मालिकेत अपयशी ठरलेला भारतीय संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. उभय देशांतील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेला गुरुवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नुकतेच ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत पराभूत केले. आफ्रिकेने घरच्या मैदानावर ‘कांगारूं’ना 3-0 अशी धूळ चारली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. दुसरीकडे न्यूझीलंड दौर्यात अप्रतिम सुरुवात करूनदेखील नंतर मात्र भारतीय संघ पुरता ढेपाळला.
भारतीय संघात शिखर धवन, हार्दिक पांड्या यांचे पुनरागमन झाले आहे. धवनच्या येण्याने मयंक अग्रवालला संघाबाहेर जावे लागले. तो न्यूझीलंड दौर्यात मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात अपयशी ठरला. या दौर्यात पृथ्वी शॉची सकारात्मक फलंदाजी बघता निवड समितीने त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे मालिकेत संघात समावेश असलेला वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर व अष्टपैलू शिवम दुबे यांना वगळण्यात आले आहे, तर अनुभवी केदार जाधवच्या स्थानी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …