Breaking News

समता सैनिक दलाचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन

नवी मुंबई : प्रतिनिधी : नवी मुंबई बेलापूर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात 25 व 26 मे दरम्यान समता सैनिक दलाचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या संमेलनाचे उद्घाटन मार्शल गुलाबराव राजे यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मार्शल भीमराव सीताराम इंगळे होते.

या वेळी विचारमंचावर भीमामार्शल विलास कांबळे, मार्शल भावे, मार्शल राजेश रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते. या समता सैनिक दलाच्या राष्ट्रीय अधिवेशनात विचारवंतांनी आपले विचार मांडताना मार्शल विलास कांबळे यांनी समता सैनिक दलाची सर्वंकष भूमिका आणि भविष्यकालीन नियोजन या विषयावर विचार व्यक्त करताना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय

स्थिती सुधारण्यासाठी संघटनेने कोणती भूमिका घ्यावी व कोणते कृती कार्यक्रम अमलात आणावे या विषयी प्रभावी उद्बोधन केले. या वेळी सभागृहात महाराष्ट्रातून व अन्य राज्यातून सुमारे 70 

मार्शल उपस्थित होते.

सर्वच मर्शलनी समता सैनिक दलाच्या  एकत्रिकरणासाठी अनुमती दर्शवली व त्यासाठी कोणत्या उपाययोजना सुचवल्या. मार्शल दीपक दाभाडे यांनी समता सैनिक दलाच्या एकत्रिकरणाची गरज का आहे ते संमेलनाच्या प्रस्ताविकेत प्रभावीपणे मांडले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply