पेण : प्रतिनिधी
पेण येथील साईसेवक आध्यात्मिक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने पेण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी (दि. 7) ही दिंडी पेणमधून रवाना झाली आहे. या पदयात्रेत अनेक तरुण सहभागी झाले आहेत. यंदाचे संस्थेचे हे 6 वे वर्ष असून मंगळवारी सकाळी पेणमधील साईमंदिरात बाबांची आरती करून ही दिंडी रवाना झाली.
पेण-खोपोली मार्गावरून लोणावळा घाट, कामशेत, तळेगाव, चाकण, मंचर, आळेफाटा मार्गे ही पायी पदयात्रा मंगळवार 14 डिसेंबर रोजी शिर्डी नगरीत दाखल होईल. त्यानंतर साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर सर्व पायी पदयात्री सदस्य पुन्हा पेणकडे परतीच्या प्रवासाला निघतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी दिली. या वेळी युवा कार्यकर्ते निकित पाटील, गणेश मूर्तिकार दीपक समेळ, समीर म्हात्रेे, पेण साईसेवक पदयात्री मंडळाचे अध्यक्ष गणेश जांभळे, अविनाश भटजी, महेश म्हात्रे, दिनेश खामकर, किरण शहा, शंकर म्हात्रे, विनोद भोईर, विलास पाटील यांच्यासह अनेक पदयात्री व भक्त उपस्थित होते.