
खालापूर ़: प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गाच्या रूंदीकरणात वृक्ष तोडताना मृत्युमुखी पडलेल्या पोपटांचे मारेकरी 20 दिवसानंतरसुद्धा मोकळे असून, त्यांच्या कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यानी दिला आहे. महामार्ग रूंदीकरणात अडथळा ठरणारे खोपोलीतील दर्ग्याजवळचे जांभळाचे झाड 20 फेब्रुवारीला कापण्यात आले. या झाडाच्या खोडातील ढोलीत पोपटांचा निवारा आहे, हे माहीत असतानाही ठेकेदाराने कटरने खोड कापले. त्यात पंधरा पोपट मृत्यमुखी पडले, त्यामध्ये वाढ झालेले चार पोपट आणि 11 पिल्लांचा समावेश होता. या घटनेचे वृत्त समजताच वन परिमंडळ अधिकारी एस. टी. ढाकवळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी मृत पोपटांचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये हलगर्जीपणा दाखवेल्या ठेकेदार आणि वृक्ष प्राधिकरणाच्या संबधीत अधिकार्यांना वाचविण्याचे प्रकार सुरू असून, त्याविरोधात खालापूरात संताप व्यक्त होत आहे.