‘मेरी आवाज हि पहचान है’मध्ये अनोखी आदरांजली
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सुरेल आठवणींना उजाळा देण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 24) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ‘मेरी आवाज हि पहचान है’ या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर झाला. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्यासह अनेक संस्थांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फटके नाट्यगृहात सुरेल गायणाच्या कार्यक्रमाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. नाट्यगृहात मेरी आवाज हि पहचान है या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा, भारत विकास परिषद, रंगनिल संस्था, रंगरचना कलामंच, संस्कार भारती पनवेल समिती आणि पनवेल कल्चरल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रमाचे आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला उपमहापौर सीताताई पाटील, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती वृषाली वाघमारे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अनिल भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, नगरसेविका दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रूचिता लोंढे, सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, महिला मोर्चा शहर अध्यक्षा वर्षा नाईक, कार्यवाहक श्यामनाथ फुंडेे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper