Breaking News

ना. नितीन गडकरी यांची प्रवाशांना भेट; बहुप्रतीक्षित रो-रो सेवेचा शुभारंभ

अलिबाग : प्रतिनिधी

केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेली भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) ही बहुप्रतीक्षित रो-रो फेरीबोट रविवारपासून (दि. 15) प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. रो-रो सेवेची बोट प्रवाशांना घेऊन मांडवा बंदरात दाखल झाली तेव्हा तिचे स्वागत करण्यात आले.  

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. दुपारी 12.15  वाजता रो-रो बोट मुंबईतील भाऊचा धक्का येथून निघाली. या बोटीचे दुपारी 1.30 वाजता मांडवा टर्मिनल्स येथे आगमन झाले. या वेळी मेरीटाईम बोर्डाचे सीईओ डॉ. एन. रामास्वामी यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. या ठिकाणी अलिबाग तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके, सुबोध राऊत, नागरिक उपस्थित होते.

या फेरीसेवेसाठी प्रोटो प्रोसेस एक्सव्ही ही अत्याधुनिक बोट ग्रीसमधून आणण्यात आली आहे. एका वेळी 500 प्रवासी आणि 145 वाहने नेण्याची या बोटीची क्षमता आहे. एम 2 एम फेरीस कंपनीमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहून तिकिट दर कमी केले जातील असे, डॉ. एम. रामास्वामी यांनी सांगितले.

Check Also

पेणमध्ये भाजपचा बूथ मेळावा उत्साहात

पेण ः रामप्रहर वृत्त रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.14) पेण तालुक्यात भाजपच्या बूथ मेळाव्याचे …

Leave a Reply