Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर प्रीमियर लीगचे उद्घाटन

पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील हमरापूर येथे प्रीमियर लीग जल्लोष 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन माजी मंत्री व पेण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 5) करण्यात आले. हमरापूर येथील मैदानावर 5 ते 9 जानेवारीपर्यंत हे क्रिकेट सामने होणार आहेत.
हमरापूर येथील प्रीमियर क्रिकेट लीगमध्ये 32 संघानी भाग घेतला असून रविवारी अंतिम सामना खेळविला जाणार आहे.
भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, चिटणीस बंडू खंडागळे, पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, पेण नगर परिषदेचे सभापती राजा म्हात्रे, सचिन शिगवण, हमरापूरचे सरपंच प्रदीप म्हात्रे, माजी सरपंच वासुदेव म्हात्रे, निळकंठ म्हात्रे आदींसह खेळाडू आणि हमरापूर विभागातील क्रिकेटप्रेमी उद्घाटन सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply