Breaking News

कर्जत नगरपरिषदेची निर्जंतुकीकरण मोहीम

कर्जत ः प्रतिनिधी

कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून कर्जत शहरात सोडियम हायपोक्लोराईटने निर्जंतुकीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कर्जत नगर परिषद क्षेत्रात अग्निशमन दलाच्या गाडीच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या आदेशानुसार तसेच यांच्या देखरेखीखाली नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातून या निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीवर असलेल्या जेट स्प्रेद्वारे ही फवारणी करण्यात येत आहे. या वेळी अग्निशमन दलाचे प्रदीप हिरे, मारुती रोकडे, दिनेश हिरे यांनी फवारणी केली. या वेळी नगर परिषदेचे अधीक्षक जितेंद्र गोसावी, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे उपस्थित होते. नगर परिषद कार्यालयापासून फवारणी सुरू करण्यात आली. ती मुख्य बाजारपेठ, जकात नाका, छत्री केंद्र, कोतवाल नगर आदी परिसरात करण्यात आली. रोज नगर परिषद क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी ही फवारणी करण्यात येणार आहे. कोतवालनगरमध्ये फवारणीदरम्यान नगरसेविका स्वामिनी मांजरे, नगरसेवक बळवंत घुमरे, माजी नगरसेवक संतोष पाटील उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply