उरण : वार्ताहर – कोरोना विषाणूपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे या उद्देशाने उरण तालुक्यातील दिघोडे ग्रामपंचायतीच्या वतीने शुक्रवारी (दि. 27) ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सुमारे सॅनिटायझर 750 व तीन हजार मास्क यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी दिघोडे ग्रामपंचायत सरपंच सोनिया मयूर घरत, उपसरपंच शारदा प्रल्हाद कासकर, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्या पूजा अभिजित पाटील, कविता शिवदास म्हात्रे, उर्मिला नरेश कोळी, किर्तीनिधी हसुराम ठाकूर, शरद हरिचंद्र कोळी, कांचन लहू घरत, कविता अलंकार कोळी तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कासकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
माझ्या गावातील नागरिकांचे कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे त्यांची सुरक्षा करणे माझे कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकी जपणे समाजासाठी चांगले काम करणे हे मी कर्तव्य मानते नागरिकांची सुरक्षा हीच सेवा मी मानते, नागरिकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य जनजागृती करीत आहेत. त्यामुळे आज मी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना मास्क, सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले आहे.
– सोनिया मयूर घरत, सरपंच, दिघोडे ग्रामपंचायत