Breaking News

नेरळमध्ये पोलिसांनी केली गाण्यातून जनजागृती

कर्जत : बातमीदार

नेरळ पोलिसांनी मैदानातील बाजार भरण्याची युक्ती सफल झाली असून आता नेरळ पोलिसांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यासाठी गाणी रचली आहेत. पोलीस ठाणे हद्दीत चौकाचौकात जाऊन पोलीस ती गाणी मोठ्या आवाजात लोकांना ऐकवत आहेत, त्याचवेळी पोलीस आता बाजारपेठ भागात असलेल्या मेडिकल स्टोरमध्ये देखील सोशल डिस्टन्स राहावा यासाठी स्वतःहून चौकोन रंगाने आखून देत आहेत. रायगड पोलीस मधील सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर असलेले बाळाजी जाधव हे नेरळ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी सामाजिक बांधिलकी जपणारी गीते रचली असून त्यांची काही पुस्तके देखील प्रकाशित झाली आहेत. शक्य तो सामाजिक बांधिलकीवर आधारित गीते त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात गाऊन प्रबोधन केले आहे. त्यात सध्या कोरोनामुळे पोलीस आपल्याकडील दंडुके यांचा प्रसाद दिला आहे. त्यातही लोक ऐकत नाही हे बघून पोलिसांनी वेगळी युक्ती आखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव दोन गाणी लोकांनी घरात का बसले पाहिजे यावर लिहिली आहेत. ती गाणी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील, पोलीस उपनिरीक्षक राम शिंदे, एम. डी. भालचिम, तात्याजी सावंजी हे सर्व अधिकारी यांना सोबत घेऊन नेरळ गावातील सर्व चौकात जाऊन पोलीस व्हॅन मध्ये असलेल्या स्पीकर वरून गात आहेत. त्यातून प्रबोधन होत असून कोणीही त्यांची गाणी ऐकायला घराच्या बाहेर येऊ नये, पण घरातून ती गाणी ऐकावी असे आवाहन पोलीस करीत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply